Entertainment

इंडियन आयडॉल विजेत्यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

उत्तराखंडच्या पवनदीप राजनने शोचे विजेतेपद पटकावले.

maharashtra-governor-felicitates-indian-idol-winner-2021

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी इंडियन आयडॉल रिआलिटी शोच्या बाराव्या सिझनचे विजेते (Indian Idol Winner 2021) युवा कलाकार पवनदीप राजनला राजभवन येथे बोलावून कौतुकाची थाप दिली.

या स्पर्धेतील प्रथम उपविजेती अरुणिता कांजीलाल हिचेदेखील राज्यपालांनी यावेळी अभिनंदन केले व दोन्ही कलाकारांना भावी सांगितिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी यावेळी आपली कला सादर केली. गेल्या वर्षी सुरू झालेल्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियन आयडलचा (Indian idol 12 winner) ग्रँड फिनाले 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी संपन्न झाला, हा सोहळा अतिशय नेत्रदीपक होता.

उत्तराखंडच्या पवनदीप राजनने शोचे (Indian Idol Winner 2021) विजेतेपद पटकावले. त्याचवेळी शोची उपविजेता अरुणिता कांजीलाल बनली. याशिवाय सायली कांबळे तृतीय आणि मोहम्मद दानिश चौथ्या क्रमांकावर, तर निहाल तारो पाचव्या क्रमांकावर आणि षण्मुखप्रिया सहाव्या क्रमांकावर होती.

इंडियन आयडॉल सीझन 12 चा (Indian idol 12 winner) विजेता पवनदीप राजनला ‘इंडियन आयडॉल 12’ ट्रॉफीसह चमकदार कार आणि 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे. पवनदीपच्या या यशावर देवभूमी उत्तराखंडमधील प्रत्येकजण खूप आनंदी आहे. पवनदीप विजेता होताच त्याच्या चाहत्यांनीही फटाके फोडले. त्याचा विजय सर्वत्र साजरा झाला.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button