Culture

पालघरमध्ये आदिवासी गौरव सप्ताह प्रारंभ

9 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2021 गौरव सप्ताह कालावधी

tribal-pride-week-to-be-celebrated-in-palghar

पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्या मार्फत 9 ऑगस्टपासून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून (Tribal Pride Week) आदिवासी गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर (Pride Week) गौरव सप्ताह 9 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. सप्ताह कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

9 ऑगस्ट 2021 रोजी डहाणूचे (Tribal Pride Week) आमदार विनोद निकोले आणि प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार विनेाद निकोले व आशिमा मित्तल यांच्या हस्ते कातकरी मुलींना सायकल (Cycle Distribution) वाटप करण्यात आले. सायकल वाटपच्या कार्यक्रमानंतर सागर नाका, डहाणू येथे पारंपारिक आदिवासी नृत्याची मानवंदना देण्यात आली.

त्यांनतर के. एल. पोंदा हायस्कूल येथे विनोद निकोले, नगराध्यक्ष भरतभाई रजपूत, के. एल. पोंदा हायस्कूलचे ट्रस्टी सुनिल पोंदा आणि आशिमा मित्तल यांचे उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर के. एल. पोंदा हायस्कूल येथे मुलांची नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल यांचे उद्घाटन करण्यात आले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button