Culture

498 वर्षांनंतर अखेर चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले रामलल्ला

अयोद्धेत श्रावण झुला मेळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे

ayodhya-shravan-jhula-mela-after-498-years-ramallah-finally-sat-on-the-silver-swing

मुंबई : रामजन्मभूमी संकुलातील (Ayodhya Shravan Jhula Mela) तात्पुरत्या मंदिरातील रामलल्ला श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने तयार केलेल्या 21 किलो चांदीच्या झुल्यावर नागपंचमीच्या दिवशी विराजमान झाले. तब्बल 498 वर्षांच्या विवादानंतर प्रथमच भगवान रामलल्ला चांदीच्या झुल्यावर विराजमान झाले आहेत.

तर आता श्रावण झुला मेळाव्यादरम्यान श्रावण पौर्णिमेपर्यंत त्याचे दर्शन झुल्यावर विराजमान असलेल्या रुपातच होईल असे मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की मंदिराच्या विवादानंतर न्यायालयाच्या आदेशावरुन रामलल्ला लाकडी झुल्यावर बसवून झुलनोत्सव साजरा केला जात होता.

परंतु आता (Ayodhya Shravan Jhula Mela) राम मंदिराच्या बाजुने सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर राम मंदिर बांधण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. अयोध्येचा सूप्रसिद्ध श्रावण झुला मेळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा केला जात आहे. यात संतांनी मणिपर्वताला होणारा झुलनोत्सव पुढे ढकलला असून तेथे भाविकांची गर्दी जमू दिली जात नाही.

दरवर्षी श्रावण जत्रेत जवळपास 10 लाख लोकांची गर्दी जमते. गेल्या वर्षी हा मेळा कोव्हिड संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आला होता, त्यामुळे यावर्षी (2021) कोविड प्रोटोकॉल अंतर्गत मंदिरांमध्ये मर्यादित संख्येने झुलनोत्सव चालू आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button