Crime

अंत्यसंस्काराला पैसे नाहीत म्हणून फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह

तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या आजोबांचा मृतदेह चादरीत गुंडाळूनदेखील ठेवला

old-man-deadbody-telangana-body-was-kept-in-the-fridge-as-there-was-no-money-for-the-funeral

हैदराबाद : तेलंगणातील एका व्यक्तीने अंत्यसंस्कार करण्यासाठी (Old Man Deadbody Telangana ) पैसे नसल्याने 93 वर्षीय आजोबांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणामधील या घटनेमुळे पोलीसही चकित झाले आहेत.

बऱ्याच दिवसांपासून येणाऱ्या दुर्गंधीने त्रस्त झालेल्या शेजाऱ्यांनी तक्रार केली असता स्थानिक पोलिसांनी वारंगलमधील परकला येथील घराची संपूर्ण झडती घेतली. यावेळी पोलिसांना घरातील फ्रिजमध्ये वृध्द व्यक्तीचा मृतदेह आढळला आणि या मागील कारण ऐकताच पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.

पीडित सेवानिवृत्त माणूस आणि त्याचा (Old Man Deadbody Telangana ) नातू निखिल या ठिकाणी भाड्याने राहत होते आणि वृद्ध व्यक्तीच्या पेन्शनवर ते हयात होते. वयोमानानुसार वृद्ध व्यक्ति अंथरुणाला खिळून होते त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे नातवाच्या स्पष्टीकरणातून समोर आले आहे. मुख्य म्हणजे तीन दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या आजोबांचा मृतदेह सुरुवातीला त्याने चादरीत गुंडाळून ठेवला होता. नंतर त्याने फ्रिजमध्ये ठेवला. पैसे नसल्याने हे कृत्य केले असे कारण त्याने सांगितले.

सदर प्रकरणातील संशयित 23 वर्षीय निखिल निवृत्तीवेतन मिळत राहावे यासाठीच हे कृत्य तर केले नाही यादृष्टीने पोलिसांची चौकशी सुरू आहे. तर सध्या संशयित मृत्यूप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button