Crime

मंत्रालयाबाहेर एका अज्ञाताचा आत्मदहनाचा प्रयत्न, कोण आहे तो?

उद्धव ठाकरे भाषण संपवून निघताच त्याने अंगावर ओतले रॉकेल

independent-day-mantralay-incident-2021

मुंबई : देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज मुंबईत मंत्रालयात एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या (Independent Day Mantralaya Incident) हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. तर, दुसरीकडे याच मंत्रालयाच्या परिसरात राज्यातील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आत्महदहनचा प्रयत्न करणार शेतकरी मुळचा जळगावमधील असून, सुनील गुजर असे त्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने आज मंत्रालय (Independent Day Mantralaya Incident) परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

प्रसिद्ध वृत्तवाहिणीने याबाबत वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं व अनर्थ टळला. सध्या त्या शेतकऱ्यास मरिनड्राईव्ह या पोलीस स्टेशनला नेण्यात आलं असून, चौकशी सुरू आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button