Crime

‘माझी बायको’ म्हणत त्याने केली गावभर पोस्टरबाजी, एकतर्फी प्रेमातून युवकाचे कृत्य

आरोपी आणि विद्यार्थीनी दोघेही एकाच कोचिंग सेंटरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते

bhopal-news-one-sided-lover-flgas-a-poster-as-his-wife

भोपाळ : भोपाळमधून (Bhopal News) एकतर्फी प्रेमातून एका प्रियकराने केलेले एक संतापजनक कृत्य नुकतेच समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थीनीने लग्नासाठी नकार दिल्याने प्रियकराने ती आपली पत्नी असल्याचे सांगत परिसरात सगळीकडे पोस्टर लावले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावरही अपलोड करण्यात आले आहेत.

आरोपी आणि विद्यार्थीनी दोघेही एकाच कोचिंग सेंटरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ही घटना मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधील बहोडापुर दुर्गा विहार कॉलनीत घडली आहे. परिसरात पोस्टर लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थीनीने युवकाला कॉल केला असता आरोपीने तिच्याकडे पैशांची मागणी केली.

हैराण झालेली विद्यार्थीनी आपल्या कुटुंबीयांसोबत बहोडपुर ठाण्यात पोहोचली आणि युवकाविरोधात एफआयआर दाखल केली. आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. बहोडपुरच्या (Bhopal News) दुर्गा विहार कॉलनीती निवासी असलेली 23 वर्षीय युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून दीड वर्षापूर्वी कोचिंगमध्येच तिची अजय करण उर्फ प्रिंस याच्यासोबत भेट झाली.

भेटीनंतर अजयने तिच्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला, जो तिने स्वीकारला. विद्यार्थीनीला माहितीही झाले नाही आणि अजय करण तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. मैत्री होताच काहीच दिवसात त्याने विद्यार्थीनीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला मात्र याला तिने नकार दिला. लग्नाला नकार दिल्यानंतर अजय करणने या विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. अनेकदा समजावूनही अजय करण सुधारला नाही त्यामुळे विद्यार्थीने त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली.

यानंतर तो तिला बदनाम करण्याची धमकी देऊ लागला. आरोपीने तिला बदनाम करण्यासाठी संपूर्ण परिसरात तिचा फोटो लावून ही आपली पत्नी असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरही फोटो अपलोड केले. जेव्हा विद्यार्थीनीने याचा विरोध केला तेव्हा आरोपीने पैशांची मागणी केली. यानंतर विद्यार्थीनीने पोलिसांत धाव घेतली.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button