Crime

मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना नवी मुंबईत अटक

गुन्हेगारांकडून सुमारे 3,25,000/ -रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

4-theft-arrested-for-navi-mumbai-temple-robbery

नवी मुंबई : नवी मुंबई, पालघर येथील मंदिरातील मुर्ती, देवाचे चांदीचे मुकूट, पादुका, दानपेटीत रोख रक्कम चोरी करणारे (Navi Mumbai Temple Robbery) तसेच पार्क केलेल्या मोटार वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीस मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्याकडून करण्यात आलेल्या कारवाईत अटक करण्यात आली. या गुन्हेगारांकडून सुमारे 2 किलो 350 ग्रॅम चांदी व 24 बॅटरी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नवी मुंबई परिसरातील मंदिरामधील देवाचे दागिणे, वस्तू तसेच दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरीचे गुन्हे (Navi Mumbai Temple Robbery) घडत असल्याने पोलीस आयुक्त, बिपीन कुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील, नवी मुंबई यांनी असे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याच अनुशंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त, प्रविणकुमार पाटील विशेष मोहीम राबवून या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन.बी. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास चालु असताना, मध्यवर्ती कक्षाचे राजेश गज्जल व राहुल वाघ यांना मंदिरांमध्ये चोरी करणारे सराईत आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी नेरुळ परिसरात सापळा लावून 1) सुभाष शितलाप्रसाद केवट (वय 35 वर्षे रा . नेरुळ) , तसेच 2) मगबुल जोमू शेखर उर्फ चिरा (वय 38 वर्षे , रा .नेरूळ) , 3) राजू मारूती वंजारे (वय 30 वर्षे , रा. नेरूळ) या तीन गुन्हेगारांना शिताफीने ताब्यात घेतले .

सदरचे इसम अतिशय सराईत असल्याने चौकशी केल्यानंतर त्यांनी पाससिक हिल, सीबीडी बेलापूर येथील राधा गिरीधारी मंदिरातील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली . या घटनेबाबत सीबीडी पोलीस ठाणे , गु. रजि. नं. 108/2021 भा. द. वि. सं. कलम 380, 454, 457, 34 गुन्हा दाखल असून नमुद गुन्हयामध्ये त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपासामध्ये वरील आरोपींनी चोरी केलेले देवाचे चांदीचे मुकूट वितळुन देणारा इसम 4) आसित कालीपदो दास (वय 45 वर्षे , रा. नेरूळ) यालादेखील अटक करण्यात आली आहे.

अधिक तपासामध्ये आरोपींत इसमांनी
1) सीबीडी पोलिस ठाणे , गु. रजि. नं. 108/2021 भा. द. वि. सं. कलम 380, 454, 457, 34 (राधा गिरीधारी मंदिर , पाससिक हिल , सीबीडी येथील मुर्तीचे चांदिचा मुकूट व दानपेटीतील रोख रक्कम)
2) न्हावाशेवा पोलीस ठाणे , गु. रजि. नं. 84 / 2021 भा. द. वि. सं. कलम 380, 34 (विठ्ठल रुखमाई मंदिर , खारकोपर येथील मुर्तीचे सोन्याचे दागिणे व चांदिच्या पादुका)
3) नेरुळ पोलीस ठाणे , गु. रजि. नं. 280/2021 भा. द. वि. सं. कलम 379, 34 (बालाजी मंदिर , नेरूळ येथील दानपेटी फोडून रोख रक्कम )
४ ) वालीव पोलीस ठाणे, जि. पालघर गु. रजि. नं. 116 9/2020 भा. द. वि. सं. कलम 380, 457, 34 (चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, मुंबई – अहमदाबाद हायवे , सातीवली, पालघर येथील मुर्ती)

नवी मुंबई, पालघर येथिल वेगवेगळया मंदिरांमध्ये चोरी केलेले गुन्हे (Navi Mumbai Temple Robbery) उघडकीस आले असून नमुद गुन्हयातील चोरी केलेले देवदेवतांचे चांदीचे मुकूट, पादुका इत्यादी असे सुमारे 2 किलो 350 ग्रॅम वजनाची चांदी हस्तगत करण्यात आलेली आहे . तसेच अधिक तपासामध्ये नमुद आरोपी व त्यांचे साथीदारांनी नवी मुंबई परीसरातून पार्क केलेल्या वाहनांच्या 24 बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या असून एकुण त्याच्याकडून सुमारे 3,25,000/ -रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरचे आरोपी हे घरफोडी चोरी करण्यात सराईत असून आरोपी सुभाष शितलाप्रसाद केवट याच्याविरूध्द यापुर्वी मंदिरातील व इतर चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .
1) एनआरआय सागरी पोलीस ठाणे , गु. रजि. नं. 24/2020 भा. द. वि. सं. कलम 37 9, 34,
2) पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक गु. रजि. नं. 44 9/ 2016 भा. द. वि. सं. कलम 380,454,457,
3) कडेवाडी पोलीस ठाणे, निफाड , नाशिक गु. रजि. नं. 118/2011 भा. द. वि. सं. कलम 380, 34
4 ) गुलाबवाडी पोलीस ठाणे, नाशिक गु. रजि. नं. 57/2007 भा. द. वि. सं. कलम 37 9, 34
5) अडगाव पोलीस ठाणे, गु. रजि. नं. 217/2015 भा. द. वि. सं. कलम 380, 34
6) उपानगर पोलीस ठाणे, गु. रजि. नं. 111/2016 भा. द. वि. सं. कलम 380, 34
7) मुंबई नाका पोलीस ठाणे, गु. रजि. नं. 60/2021 भा. द. वि. सं. कलम 380,454,457,

सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, ज्ञानेश्वर भेदोडकर, जी. डी. देवडे व पोलीस अमलदार सतीश सरफरे, आतिष कदम, हरेश भगत, लक्ष्मण कोपरकर, अजय कदम, राहुल वाघ व विजय खरटमोल यांनी केलेली आहे.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button