Agriculture

E-peek : माझी शेती,माझा सात बारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा….

ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील मौजे आवरे,पिरकोन,पाले येथे थेट बांधावरुन प्रशिक्षण संपन्न

अलिबाग : शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पिकांची माहिती ई-पीक (E-peek) पाहणी ॲप च्या माध्यमातून तलाठी यांना थेट ऑनलाईन कळविण्यासाठी ई-पीक पाहणी हा प्रकल्प शासनाने राज्यभर सुरू केला आहे. याबाबत ग्रामस्तरावर प्रचार व प्रसिध्दीचे कामकाज राज्यभर सुरू असून उरण तालुक्यातील मौजे आवरे, पिरकोन, पाले या गावात शेतकरी बांधवांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच, जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी मंडळी उपस्थित होते.

e-peek-my-farm-my-seven-or-twelve-i-will-register-my-crop

खरीप हंगामातील पिकांची माहिती ई-पीक (E-peek) पाहणी मोबाईल ॲपच्या माध्यमातून दि.15 सप्टेंबर 2021 पर्यत पूर्ण करण्यात यावी तसेच याबाबत काही अडचणी येत असल्यास गावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतः शेतात लावलेली पिके व फळबाग, सिंचन पद्धती, शेतातील झाडे इत्यादी माहिती भरू शकणार आहेत. यावरून गाव नमुना 12 मध्ये पिके अद्यावत केली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे शेतकरी आपल्या पिकाबाबत आत्मनिर्भर होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

जुई सज्जाचे तलाठी शशिकांत सानप यांनी उपस्थिताना प्रशिक्षण देताना ई-पीक पाहणी मुळे शेतकऱ्यांना मिळणारी थेट शासकीय मदत, शेतमालाची आधारभूत किंमत, विकेल ते पिकेल योजना, नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई, पिकाची अवस्था, पेरणी व पिकाखालील सिंचन क्षेत्र याबाबतची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेस नीता गोरेगावकर, मंडळ अधिकारी कोप्रोली, अनिल पाटील, तलाठी आवरे, भाऊ पिरकर, तलाठी, कोप्रोली, संतोष धुमकनाळे,तलाठी,पिरकोन, अनिल जोशी,तलाठी, वशेणी हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणासाठी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके व उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

PN NEWS चे टेलीग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button