विधानसभा निवडणुकीतील ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी हिची आत्महत्या – वजायनोप्लास्टी शस्त्रक्रियेत चूक झाल्याची केली होती तक्रार

महाराष्ट्र

केरळ : केरळ विधानसभा निवडणुकीतील पाहिल्या ट्रान्सजेंडर उमेदवार RJ अनन्या कुमारी अलेक्स (ananya Kumari alex) हिचा राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. अनन्याचा मृतदेह कोची येथील फ्लॅटच्या छताला लटकलेला आढळल्याने तिने आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. अनन्या केरळची पहिली ट्रान्सजेंडर RJ होती. अनन्याने अलीकडेच एका डॉक्टर आणि खासगी रुग्णालयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता आणि या प्रकरणात न्यायाची मागणी केली होती.

अनन्याने 2020 (ananya Kumari alex)  मध्ये कोचीच्या एका खासगी रुग्णालयात वजायनोप्लास्टी शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेच्या एक वर्षानंतरही तिला आरोग्याच्या कुरबुरी जाणवत होत्या आणि तिला जास्त काळ उभे राहण्यासदेखील कठीण जात होते. त्यामुळे शस्त्रक्रियेत चूक झाल्याची तक्रार तिने काही आठवड्यांपूर्वीच नोंदवली होती. आरोग्याच्या अडचणीनंमुळे त्यांनी निवणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता.

यापूर्वी एप्रिलमध्येही अनन्या कुमारीने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. यामागील कारण स्पष्ट करताना अनन्या, डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पार्टीच्या नेत्यांनी माझा मानसिक छळ केला होता आणि मला जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

केरळनंतर कोल्हापुरातही तृतीयपंथीयाच्या अचानक मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने कोल्हापुरातील तृतीयपंथी सतीश पवार उर्फ देवमामा यांची हत्या केली असल्याचा संशय बळावला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *