
नवी दिल्ली : अफगाणिस्तानवरून 87 भारतीयांना घेऊन वायू सेनेचे एक विशेष विमान पहाटे दिल्लीत (Indian Evacuation From Afghanistan) दाखल झाले. या नागरिकांना शनिवारी भारतीय वायू सेनेच्या विमानाद्वारे सर्वप्रथम काबूलवरून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेले गेले होते. या पाठोपाठच भारतीय वायू सेनेच्या C-17 या विमानाने देखील काबूलहून 168 नागरिकांना घेऊन, उड्डाण घेतलेले आहे. ज्यामध्ये 197 भारतीय आणि काही 20 अफगान शीख व हिंदू सहभागी होते.
अफगाणिस्तानचे (Indian Evacuation From Afghanistan) खासदार नरेंद्र सिंह खालसा हे देखील C-17 विमानातील 23 अफगाणी शीख नागरिकांमध्ये सहभागी आहेत. हे विमान आज गाजियाबाद हिंडन आय.ए.एफ. बेस वर उतरणार असल्याची सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ए.एन.आय.ने माहिती दिली आहे.
“स्थलांतर सुरू आहे!
107 भारतीय नागरिकांसह 168 प्रवासी असलेले भारतीय वायुसेनेचे विशेष परतीचे विमान काबूलहून दिल्लीला जात आहे,” अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विटद्वारे दिलेली आहे.
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी अमेरिकेचा मोठा निर्णय!
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकेलल्या भारतीयांना परत यायचे असल्याने, ते काबूल विमानतळावर जमा होत आहेत. या दरम्यान, आता भारताला या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी रोज दोन विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली आहे.